Latest Marathi News

Trending Now

ग्रामीण विकास केंद्र जामखेड यांच्या माध्यमातून चालणारे काम कौतुकास्पद – सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड

0

 

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथील ग्रामिण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहात असणाऱ्या निराधार मुलां, मुलींनी अधिकारी होण्यासाठी मेहनत करावी, शिक्षण किती महत्वाचे आहे व शिक्षणामुळे कसे अधिकारी होता येते याविषयी माहिती दिली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिक्षणाच्या माध्यमातून आई वडिलांचं स्वप्न आपण पूर्ण करणार आहात असे खर्डा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक झंजाड यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री कानिफनाथ यात्रेनिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व खर्डा पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक विजय झंजाड यांच्या संकल्पनेतून निवारा बालगृहातील अनाथ, निराधार मुलामुलींना यात्रेच्या माध्यमातून एक आनंदाचा क्षण यात्रेत उंच पाळण्यात बसवणे असा एक आगळावेगळा कार्यक्रम खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी सामाजिक भावनेतून या लहान मुलांना यात्रेचा मनोसोक्त आंनद देण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलांना त्यांनी स्वखर्चाने उंच पाळण्यात बसवले.तसेच मुलांच्या पंक्तीमध्ये बसून जेवण केले.यावेळी खर्डा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार संभाजी शेंडे,पोलीस कॉन्स्टेबल सी.सी. मस्के,बाळू खाडे, बाळू मिसाळ, हंबर्डे, आवारे तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार, भीमराव सुरवसे, निवारा बालगृहचे शिक्षक तुकाराम शिंदे,सुरेखाताई चव्हाण, छायाताई मोरे, गौतमी, पायलताई, प्रतीक्षा खडके, सुरज तायडे आदी उपस्थित होते. व खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.