Latest Marathi News

Trending Now

भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांचे अमळनेर शहर व तालुक्यात जल्लोषात स्वागत

0

 

*जळगाव/प्रतिनिधि/सुरेश कोहली :* भाजपच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ अमळनेर शहर व तालुक्यातील कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या भेटी घेतल्या. ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या जल्लोषात व ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या पाकळ्या उधळत उत्साहात स्वागत करण्यात आले. स्मिताताईंच्या रूपाने आपल्या हक्काचा माणूस खासदार म्हणून लाभणार आहे. पर्यायाने मतदारसंघाच्या विकासाला आता वेग येणार आहे. आपल्या गावाचा खासदार होण्यासारखा दुसरा आनंद नाही, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
स्मिताताई वाघ यांनी अमळनेर तालुक्यातील शिरूड, जवखेडा, पिंपळे येथील गुरुदेव दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मध्वमूनी महाराज यांच्या गादीचे देखील त्यांनी दर्शन घेतले. जवखेडा, पिंप्री, पारोळा ढेकु, वाडी शिरपूर या ठिकाणी महाराजांची मंदिरे आहेत. या परिसरामध्ये हे संस्थान जागृत संस्था म्हणून ओळखले जाते. यावेळी त्रेतापुरी महाराज यांनी शुभाशीर्वाद दिले. मंदिर संस्थानच्या सभा मंडपामध्ये यावेळी ग्रामस्थ महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवखेडा येथे गावाच्या स्वागत कमानी जवळ ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत स्मिताताई वाघ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जवखेडा येथे असलेल्या दत्त संस्थानच्या मंदिराला स्मिताताई वाघ यांनी भेट दिली. या ठिकाणी देखील मंदिराच्या सभा मंडपात कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते. यावेळी संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, की आज अभिमान वाटावा, गर्व वाटावा असा क्षण आलेला आहे. स्मिताताई वाघ या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. विकासाची दूरदृष्टी लाभलेल्या स्मिताताई खासदार झाल्यानंतर निश्चितपणे मतदारसंघाचा विकास होणार आहे. स्मिताताई वाघ यांचे पिंपळे बु , पिंपळे खुर्द, अटाले येथेही स्वागत करण्यात आले. अमळनेर शहरातील फरशी रोड येथील एबी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि फुलांची उधळण करत स्मिताताई वाघ यांचे स्वागत केले.
*अमळनेर वकील संघाकडून स्वागत*
अमळनेर शहरातील वकील संघाच्या वतीने स्मिताताई वाघ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. निवडणुकीतील यशासाठी स्मिताताई वाघ यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या. यावेळी अमळनेर वकील संघाचे सचिव ॲड. जितेंद्र साळी, अध्यक्ष चेतना पाटील, उमाकांत पाटील, आर आर भटनागर, आर. ए. निकुंभ, पी. व्ही. कुलकर्णी, के. व्ही. कुलकर्णी, अशोक बोरसे, जी.आर. अग्रवाल, गोपाळ सोनवणे, उमेश पाटील, शैलेश ब्रम्हे, विजय डिवरे, राजेश बिराडे, प्रशांत बडगुजर, प्रशांत संदनशिव, आर. व्ही. निकुंभ, प्रतिभा पांडे, माधुरी ढिवरे, टी.सी. पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.