Latest Marathi News

Trending Now

जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार यांनी आज रोजी तहसील कार्यालय येथे तहसीलदार गणेश माळी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
‌ या निवेदनात म्हटले आहे की,
गोरगरीब जनतेला आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.नवीन व जुने कुपन यांची तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच वृद्ध महिलांना डोल प्रकरणाचे प्रस्ताव केव्हा सादर करायचे. व मासिक मीटिंग व प्रस्तावला लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती मिळावी. जामखेड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान किती बंद आहेत व किती जणांचे परवाने रद्द आहेत याची माहिती मिळावी. तसेच जामखेड तालुक्यातील गोरगरिबांना नवीन कुपन मिळाले आहे. अजून त्यांना धान्य पुरवठा होत नाही. तरी त्यांची ऑनलाइन / प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात मागणी असते. तरी, खालील मागण्याची वेळेत व लवकरात लवकर कार्यवाही केल्यास गोरगरीब जनतेला आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. या मागण्यांची ताक्ताळ अंमलबजावणी करून संबंधित कार्यलयास आपल्या स्तरावरून सुचित करण्यात यावे.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिंदे, अर्चना जाधव, अर्चना बावडकर आदी उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.