Latest Marathi News

Trending Now

पत्रकार गितांजली लव्हाळे – वानखडे यांना पद्मपाणि प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान…

0

बीड | प्रतिनिधी :-

पद्मपाणि प्रतिष्ठान बीड व साप्ताहिक जनसूर्य यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पद्मपाणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ नुकताच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे रविवार दि.१७ मार्च २०२४ रोजी संपन्न झाला.
पद्मपाणी प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक वर्षी समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक,पत्रकार,औद्योगिक, साहित्यिक,शाळा,सामाजिक संस्था,कला क्रिडा इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या घटकांना राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते या वर्षी उत्कृष्ट पत्रकारिता मधील राज्यस्तरीय पुरस्कार वडवणी तालुक्यातील प्रथम महिला पत्रकार सौ.गितांजली रंगराव लव्हाळे -वानखडे यांना प्रदान करण्यात आला सामाजिक क्षेत्रात व पत्रकारितेमध्ये भरीव कार्य केल्यामुळे अनेक सामाजिक संस्थेने त्यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे भारतीय संविधानाची मूल्ये समाजामध्ये रुजवणाऱ्या,सक्षम लोकशाही व अखंड भारत देशाप्रती निर्भीड व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या एक निर्भीड महिला पत्रकार म्हणून पद्मपाणि राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी सौ.गितांजली लव्हाळे-वानखडे यांची निवड करण्यात आली हा पुरस्कार पुढील कार्यामध्ये त्यांना प्रेरणादायी ठरेल.
पद्मपाणि पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष दैनिक लोकाशाचे संपादक तथा उद्योजक बीड मा.विजयराजजी बंब तसेच मा.नानाभाऊ हजारे जेष्ठ शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग जि.प.बीड,बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष तथा पुरस्कार वितरण समारंभाचे उद्घाटक मा.बाबुरावजी पोटभरे,पद्ममपाणि प्रतिष्ठांनचे संस्थापक दीपक तरकसे,झुंजार नेता दैनिकांचे उपसंपादक आत्माराम वाव्हळ या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार वितरण समारंभाच्या प्रसंगी पद्मपाणि प्रतिष्ठानचे संचालक,सभासद व पुरस्कर्ते तसेच सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
पत्रकार गीतांजली लव्हाळे -वानखडे यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.