Latest Marathi News

Trending Now

कोळवडी येथे कृषिकन्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

निंबोळी अर्क तयार करणे व फवारणी बाबत

0

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील कृषी पदवीच्या चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांनी कृषी जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्यांनी कर्जत तालुक्यातील कोळवडी येथे शेतकऱ्यांना निंबोळी पासुन तयार होणाऱ्या निंबोळी अर्काबद्दल तसेच निंबोळी अर्क कधी वापरावा आणि निंबोळी अर्काचे फायदे कोणते या विषयी सविस्तर माहिती दिली.
कडुनिंब या झाडाला लागणारे फळ म्हणजे निंबोळी या निंबोळीचे भरपूर फायदे आहेत. निंबोळी अर्क पिकांच्या फवारणीसाठी वापरला जातो. एक एकर ला 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी लागते. निंबोळी अर्क कीड व्यवस्थापनासाठी वापरले जाते. निंबोळी मध्ये “अझाडीरॅक्टिन ” नावाचे कीटकनाशक असते. हा घटक कीटकनाशक म्हणून काम करतोच शिवाय विषाणूनाशक, सुत्रकुमी , बुरशीनाशक म्हणून देखील काम करते. निंबोळी अर्काने मावा, पांढरी माशी, फुलकिडे या सारख्या वेगवेगळ्या किड्यांवर व आळ्यांवर नियंत्रण मिळवता येते. याविषयी सविस्तर माहिती कृषी कन्याने शेतकऱ्यांना सांगितली.
सदर कार्यक्रमांत महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे , कार्यक्रम समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे , अधिष्ठाता प्रतिनिधी प्रा.पी.एस.पवार , चेअरमन डॉ. प्रेरणा भोसले , कार्यक्रम अधिकारी प्रा.अर्चना महाजन तसेच विषयतज्ञ डॉ. नजीर तांबोळी सर आदींनी मार्गदर्शन केले .

Leave A Reply

Your email address will not be published.