Latest Marathi News

Trending Now

वृद्ध साहित्यिक कला शासकीय समितीवर उपाध्यक्षपदी शैलाताई मुसळे यांची वर्णी

0

बीड प्रतिनिधी
भाजपाच्या महिला जिल्हा सरचिटणीस शैलाताई मुसळे यांची वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजने अंतर्गत वृद्ध साहित्यिक कला शासकीय जिल्हा समितीवर उपाध्यक्ष पदावर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्रातील सन्मानार्थिक वृद्ध साहित्यिक व कलावंत आदिना या योजनेअंतर्गत दरमहा मानधन दिले जाते. मानधनास पात्र असणाऱ्या कलावंतांची निवड करण्यासाठी शासनाने वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती गठित केलेली आहे.या समितीमध्ये पुनर्रचना करण्याच्या संदर्भीय 5 अन्वये अधिकाराचा वापर करत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हास्तरीय समितीमध्ये केलेल्या शिफारशीवरून श्रीमती शैला बाबुराव मुसळे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी शासकीय समितीवर निवड केल्याबाबत निवड समितीचे पदसिद्ध सचिव जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या स्वाक्षरीचे पत्र 20 फेब्रुवारी 2024 रोजी निघालेल्या आदेशानुसार त्यांची निवड त्याचवेळी जाहीर झालेली होती. या निवडीनंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी झालेल्या मानधन कलावंत बैठकीमध्ये कलावंतांची रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न शैलाताई मुसळे यांनी केल्या बद्दल कलावंतामधून अभिनंदन होत आहे. भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे, बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतम ताई मुंडे आणि भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निष्ठावंत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या शिफारसी वरून सदरील निवड करण्यात आली. या निवडीबद्दल पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी तसेच पत्रकार शेख आयेशा, रेखा काळे, सुरेखा काळे, शोभा सोनवणे, सुनिता मुसळे, आकाश बाई काळे, छायाबाई काळे, शाहीर ठोंबरे, रत्नपारखे आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.